Banjara ST Reservation Protest | अहिल्यानगरमध्ये Banjara समाजाचा विराट मोर्चा, मुंबईचा इशारा
Continues below advertisement
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट मोर्चा काढण्यात येत आहे. शहरातील क्लेरा ब्रुज शाळेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. आंदोलक पारंपारिक वेशभूषा परिधान करून जमा झाले आहेत. समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्तेही जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 'जर आम्हाला जिल्ह्यामधे राज्यामधे न्याय मिळाला नाही तर आम्ही आता मुंबईमधे देखील मोर्चा काढू' असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement