Ban on Meat Advertisements :मांसाहाराच्या जाहिरातींवर सरसकट बंदीची मागणी,जैन संघटनांची मागणी

Continues below advertisement

मांसाहाराच्या जाहिरातींवर सरसकट बंदीची मागणी करत काही जैन संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यावर उद्या सुनावणी होणार आहे...सार्वजनिक ठिकाणी आणि टिव्ही सह इतर मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी मांसाहारशी संबंधित जाहीरातबाजी बंद करण्यात यावी अशी जैन संघटनांची मागणी आहे.. या जाहिरातींमुळे त्यांच्या शांततेत जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा युक्तिवाद करण्यात येतोय.. मांसाहाराला आमचा विरोध नाही. पण शाकाहारी लोकांच्या घराजवळ त्याची जाहीरात करणं हे त्या समुदायाच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणल्यासारखं आहे. असा आरोप या जनहीत याचिकेतून करण्यात आला आहे. श्री ट्रस्टी आत्म कमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट, सेठ मोतीशा धर्मादाय ट्रस्ट आणि श्री वर्धमान परिवार आणि ज्योतींद्र शाह यांनी एकत्रितपणे ही याचिका दाखल केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram