Rajan Patil Join BJP : आमदार राजन पाटील, यशवतं मानेंचा भाजपात पक्षप्रवेश
Continues below advertisement
सोलापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील (Balraje Patil) आणि सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील (Ajinkya Rana Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'मी निःसिंधू राहणारा माणूस आहे, जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचा कमळ हातात घेऊनच आम्ही पाठिंबा देतो,' अशी ग्वाही पक्षप्रवेश केलेल्या नेत्याने दिली. येत्या काळात जिल्हा परिषद, नगरपालिका आणि बँक अशा सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांचा प्रवेश तूर्तास लांबणीवर पडला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement