Nepal Political Crisis | Balen Shah PM पदाच्या शर्यतीत, Gen Z आंदोलनाचं समर्थन
नेपाळमध्ये नवं सरकार बनवण्यावर चर्चा सुरू आहे. या संदर्भात रवी लामिछाने आणि बालेन शाह यांच्यात नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. बालेन शाह हे नेपाळी रॅपर आणि संगीतकार असून, काठमांडूचे विद्यमान महापौर आहेत. नेपाळच्या राजकारणातला तरुण चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अवघ्या ३८व्या वर्षी ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. झेन झी आंदोलनाला पाठिंबा देणारे ते पहिले राजकारणी आहेत. नेत्यांची घरं जाळताना आंदोलकांनी बालेन शाह यांच्या नावानं घोषणाबाजी केली होती. लष्करानं ताबा घेतल्यावर बालेन शहांकडे अंतरिम पंतप्रधानपद जाऊ शकतं अशी चर्चा आहे. झेन झी म्हणजेच तरुणांनी आंदोलन हाती घेतल्यामुळे तरुण पंतप्रधान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोन हजार बावीसमध्ये अपक्ष लढून बालेन शाह काठमांडूचे महापौर झाले होते. सोशल मीडिया आणि तरुणांच्या माध्यमातून त्यांनी दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला. बालेन शाह यांनी झेन झी आंदोलकांना "आंदोलकांनी आता शांत व्हावं" असं आवाहन केलं आहे. या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.