Balbharati Book : बालभारतीच्या पुस्तकातून QR कोड का वगळला? रणजीतसिंह डिसलेंच ट्विटरमधून सवाल
राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्यात आणि पहिल्यात दिवशी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी नाराजीचा ट्वीट केलाय. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनातर्फे पुस्तके देण्यात आलीत. पण या पुस्तकांत QR कोड नाहीत. रणजितसिंह डिसले यांच्या संकल्पनेतून शिक्षण अधिकरंजक करण्याच्या हेतूने पुस्तकांमध्ये QR कोडचा समावेश करण्यात आला होता. QR कोडमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑडिओ आणि व्हिडिओ रुपात अभ्यासक्रम शिकता येत होते. मात्र हेच क्यूआर कोड पुस्तकातून काढल्याने त्यावर दिसले सरांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केलेत.