फडणवीस दिल्लीत जाऊन बसले तर जास्त मदत करु शकतात, पण दुर्दैवाने पोलीस स्टेशनला गेले : बाळासाहेब थोरात

Continues below advertisement

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन तुटवड्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. "देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन बसले तर मदत करु शकतात, पण दुर्दैवाने ते पोलीस स्थानकात जाऊन बसतात," असं थोरात म्हणाले. तसंच "देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. रेमडेसिवीरचा साठा राज्याला मिळावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे. परंतु तो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठिशी घालणं योग्य नव्हतं. ही कंपनी गुजरातमध्ये काळाबाजार करताना पकडली गेली आहे. फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी सरकारला, पर्यायाने जनतेला मदत करण्यासाठी मदत करायला हवी" असंही त्यांनी म्हटलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram