Balasaheb Thorat : विरोधीपक्ष नेता कुणाला करायचा याची चर्चा सुरु करा; फडणवीसांना टोला
Balasaheb Thorat : विरोधीपक्ष नेता कुणाला करायचा याची चर्चा सुरु करा; फडणवीसांना टोला
नागपूर : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी थोरात यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून महायुतीच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा विरोधी पक्ष नेता कोणा होणार यावर चर्चा करायला हरकत नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
बाळासाहेब थोरात यांनी नागपूरमध्ये एबीपी माझाच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप, वन नेशन वन इलेक्शन याबाबत भाष्य केलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून महायुतीच्या नेत्यांनी आता विरोधी पक्ष नेता कोण होणार यावर चर्चा करायला हरकत नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात देखील बोलले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. आम्ही ज्यावेळी चर्चेला बसतो त्यावेळी एक एक मतदारसंघाचं नाव पुढं येत असतं. त्या मतदारसंघावर आम्ही दावा करतो, काही वेळा मित्रपक्षांकडून दावा केला जातो, असं थोरात यांनी म्हटलं.