Bajrang Sonawane Wins Beed Lok Sabha : पंकजा मुंडेंची फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, बजरंग सोनवणे विजयी
Pankaja Munde on Bajrang Sonawane : पंकजा मुंडेंची पुनर्मतमोजणीची याचिका फेटाळली, बजरंग सोनवणे जायंट किलर
बीड : लोकसभा निवडणुकांच्या निकालात यंदा अनेक धक्कादायक आकडे पाहायला मिळाले असून देशात इंडिया आघाडीला व राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला असून सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर, राज्यात सर्वात हाय व्होल्टेज आणि जातीय रंग लागल्याने चर्चेत ठरलेली लढत बीड लोकसभा मतदारसंघात झाली. बीड, परभणी, जालना मतदारसंघात मराठा आरक्षणाचा व मनोज जरांगे फॅक्टर जाणवल्याचं दिसून आलं. बीडमध्ये पहिल्या फेरीपासूनच अत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामध्ये, पहिल्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी 1359 मतांचे मताधिक्य घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर, तिसऱ्या फेरीतही सोनवणे आघाडीवर होते. मात्र, बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.