Bajrang Sonawane : विधानसभेला PM Modi यांनी सभा घेतली, पंकजा मुंडेंचा पराभव झाला”

Continues below advertisement

मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. राष्ट्रीय पातळीवर कोणाचीही सत्ता आली तरी अनेकांचे लक्ष हे महाराष्ट्रात (Maharashtra Lok Sabha Election 2024) नक्की काय घडणार, याकडे लागले आहे. गेल्या बराच काळापासून महाराष्ट्रातील राजकारण अस्थिर राहिले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बहाल केले असले तरी या पक्षांचा मूळ मतदार नक्की कोणाच्या पाठीशी आहे, याचा फैसला लोकसभा निकालाच्यानिमित्ताने (Election Result 2024) होणार आहे.

एक्झिट पोलच्या निकालांमध्येही देशपातळीवर भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज असला तरी महाराष्ट्रातीच चित्र तंतोतंत उलटे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून निघालेला एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यामुळे स्थानिक राजकारणाची सरमिसळ झाली होती. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातील जनाधार कोणाच्या पाठीशी आहे, याबद्दल संभ्रम आहे. याचा फैसला आता होणार आहे. 

राज्यातील अनेक मतदारसंघांमधील लढती प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामती, माढा, सोलापूर, सातारा या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची झाली होती. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागणार, याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला लागून राहिली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram