Bajrang Sonawane on Walmik Karad| वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता- बजरंग सोनावणे

Continues below advertisement

Bajrang Sonawane on Walmik Karad| वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता- बजरंग सोनावणे'

" हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते. म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यातही तीच गाडी असणार आहे. तीच गाडी सरेंडर करायला होती. तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती. मला वाटतं पांढऱ्या किंवा काळ्या कलरची गाडी होती", असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सुरेश धस म्हणाले, बीडच्या लॉकअपमध्ये हे आरोपी ठेऊ नयेत. हे एकतर संभाजीनगरच्या हरसूलला न्यावेत, किंवा नाशिकच्या जेलमध्ये ठेवावेत. कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला लागतील. बिंदू नामावलीमध्ये एसटीच्या जागेवर ठराविक प्रवर्गाचे लोक आले आहेत. एस.सी.च्या जागेवरही ठराविक जागेवरचे लोक आलेत. एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने अधिकारी कर्मचारी बीड जिल्ह्यात कोणत्याही बाबतीत प्रॉबलेम होऊ शकतो. भविष्यात केससुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याची वेळ येईल. बजरंग बाप्पांचे सोर्सेस जास्त असतील. एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर राज्यातील मंत्री ज्यांनी गोपनियतेची शपथ घेतलेली आहे. ते तिथं थांबत असतील तर मंत्री म्हणून घ्यायला देखील ते पात्र नाहीत, असंही सुरेश धस यांनी सांगितलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram