Badlapur रेल्वे ट्रॅकवर पाणी; 9 तासांपासून उद्यान आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात अडकून

Continues below advertisement

बदलापुरात मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. त्यामुळे गेल्या १२ तासांपासून उद्यान एक्स्प्रेस बदलापूर स्थानकात अडकून पडली आहे. बदलापूर ते वांगणी स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाच फुटांपर्यंत पाणी साचलंय. त्यामुळे ट्रेन्स ठप्प आहेत. उद्यान एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे मात्र मोठे हाल होतायत. रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्यानं प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या सगळ्या प्रकारामुळे बदलापूरकरांना गेल्या वर्षी पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची आठवण आल्याशिवाय राहिलेली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram