Badlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंग

Continues below advertisement

Badlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंग

बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करण्यात आले होते. दरम्यान, आरोपीचे एन्काऊंटर झाल्यानंतर पीडित मुलींच्या आई-वडिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. "अक्षय शिंदेचं एन्काऊंटर ही चांगली गोष्ट नाही, सरकारने शिक्षा द्यायला हवी होती. त्याची चौकशी करायला हवी होती. या प्रकरणात अनेक जण सामील असू शकतात. हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे", अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली आहे. 

पीडित मुलीची आई काय म्हणाली? 

एन्काऊंटर झालाय ही चांगली गोष्ट नाही, त्याला सरकारने शिक्षा द्यायला हवी होती. मुलगी मध्यरात्रीची झोपेतून रडत रडत उठते, घाबरते रडत बसते, अजूनही ती या परिस्थितीमधून सावरलेली नाही.  सुरुवातीला दोन-तीन दिवस पोलीस वेगवेगळे अधिकारी चौकशीसाठी आले. त्यानंतर कोणीही आमच्या घरी आले नाही.  अक्षय शिंदे याची चौकशी होणं अपेक्षित होतं. त्याच्यासोबत कोण कोण होतं? त्याला शाळेत का घेतलं होतं? याची चौकशी करणे अपेक्षित होतं. एन्काऊंटर व्हायला नको होतं. अजून चौकशी व्हायला हवी होती. यामध्ये अनेक लोक सामील असणार त्याचा एन्काऊंटर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असंही पीडित मुलीच्या आईने म्हटलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram