Bachchu Kadu vs Prakash Ambedkar : कुणबी मराठावरून आरोप प्रत्यारोप

Continues below advertisement

Bachhu Kadu vs Prakash Ambedkar : कुणबी मराठावरून आरोप प्रत्यारोप  "दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहात नाही. शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतोय. 15-20 आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करु, उचलून नेऊन टाकू समुद्रात, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजेत", असे अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. ते हिंगोलीमध्ये बोलत होते.   तुमच्या बापाचं राज्य आहे का? बच्चू कडू अजून जीवंत आहे बच्चू कडू म्हणाले, आपली लढाई कष्ट करणाऱ्यांची आहे. एसटीमध्ये ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला 12 हजार महिना मिळतात आणि कलेक्टरच्या गाडीवर असलेल्या माणसाला 25 हजार रुपये महिना मिळतो. तू एका माणसाला घेऊन जातो तुला 45 हजार मिळतात. आमचा एसटी ड्रायव्हर 50 लोकांना घेऊन जातो, त्याला 12 हजार रुपये मिळतात. तुमच्या बापाचं राज्य आहे का? बच्चू कडू अजून जीवंत आहे. या लोकांना उखडून फेकून टाकू. तुमचं बाथरुम 5 लाखांचं आणि आमचं घर सव्वा लाखाचं, तुम्हाला लाज वाटत नाही का? हे कोणी विचारत नाही. घेतली कावड की निघाला. जातीच्या नावावर निवडून येणारे बरेच जण आहेत, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.   तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडूंची 25 जागांसाठी चाचपणी तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडूंनी 25 जागांसाठी चाचपणी केली आहे. सरकारकडे आमच्या 18 मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे, MIM सोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू अन्यथा आम्ही बसणार नाही. वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षाचं एक मत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढू. आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram