Bachhu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कर्तव्य यात्रेला तुफान प्रतिसाद

Continues below advertisement
ग्रामीण भागातील नागरिकांची सरकारी कार्यालयातील कामे वारंवार चकरा मारून ही होत नाही. तेच काम एका तासात करण्याचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मागील 15 वर्षांपासून बच्चू कडू यांनी आपल्या मतदार संघातील चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात 'कर्तव्य" यात्रेच्या माध्यमातून "राहुटी" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात 20 नोव्हेंबर पासून सुरू झाली असून या यात्रेदरम्यान नागरिकांची प्रलंबित कामे जागेवरच निकाली काढण्यात येत आहेत. या कर्तव्य यात्रेला तुफान प्रतिसाद मिळतोय...
 
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात हा उपक्रम मागील 15 वर्षांपासून राबवला आहे, आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावात या उपक्रमात गावातील समस्या गावातच निकाली निघत असून यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी उसळली आहे.
 
20 नोव्हेंबर पासून या कर्तव्य यात्रेला सुरुवात झाली असून अचलपूर मतदार संघात ही यात्रा संपली की संपूर्ण राज्यात ही कर्तव्य यात्रा जाणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.. स्वतः बच्चू कडू हे जागेवर खाली बसून नागरिक घेऊन आलेले कामे समजून घेऊन ते अधिकाऱ्यांना सांगून करून घेत आहे. यापूर्वी आमदार असतानाही बच्चू कडू यांच्याकडून हा उपक्रम राबविण्यात येत होता. आता, मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही त्यांनी ही सेवा सुरुच ठेवली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचीत आहेत. सर्वसामान्य, गरिब अन् दिव्यांग व्यक्तींसाठी हे धावून येतात, आमदार असताना बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघात ''आमदाराची राहुटी आपल्या गावात'' ही योजना राबवली होती. त्यांची हीच योजना आता राज्यमंत्र्याची राहुटी आणि आता कर्तव्य यात्रा आपल्या गावात अशी बनली आहे. या उपक्रमात सर्व शासकीय अधिकारी या कर्तव्य यात्रा उपक्रमात येत असून नागरिक घेवून आलेले कामे येथे होत आहे.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram