Nagpur Protest: 'न्यायालयाचा सन्मान करू', कोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू नरमले, महामार्गावरील आंदोलन मागे
Continues below advertisement
नागपूरमधील (Nagpur) शेतकरी आंदोलनाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी न्यायालयाच्या निर्देशानंतर महामार्गावरील आपले 'चक्का जाम' आंदोलन मागे घेतले आहे. न्यायालयाने 'महामार्ग अडवता येणार नाही, लोकांची अडचण निर्माण करता येणार नाही', असे स्पष्ट मत नोंदवल्यानंतर बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. यानंतर आंदोलकांनी नागपूर-वर्धा महामार्गावरील तब्बल तीस तास चाललेले आंदोलन मागे घेऊन जामठा (Jamtha) परिसरातून आपला मुक्काम हलवला. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, आंदोलकांना आता परसोडी (Parsodi) येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राजवळील मैदानावर शांततेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील रोखून धरलेले चारही महामार्ग आता मोकळे झाले असून वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement