Farmers Protest: 'आश्वासन का दिलं?', Devendra Fadnavis यांच्या 'सातबारा कोरा' घोषणेवरून बच्चू कडू आक्रमक
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. 'आम्ही सातबारा कोरा करणार असं आश्वासन का दिलं?' असा थेट सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता याच आश्वासनावरून बच्चू कडू यांनी हजारो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने 'महाएल्गार आंदोलन' सुरू केले आहे. जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा कडू यांनी दिला आहे. या आंदोलनाला राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement