Nagpur Farmers Protest : बच्चू कडूंचा महाएल्गार, आंदोलनावर ठाम, सरकारसमोर पेच
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) शेतकरी कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या 'महाएल्गार' आंदोलनामुळे शहराची प्रचंड कोंडी झाली आहे. 'शेतकरी दररोज आत्महत्या करतायत, शेतीमधून नोंदवून लोक आत्महत्या करतायत, त्यावेळी या न्यायव्यवस्थेचे डोळे फुटले का?', असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी कोर्टाच्या निर्देशावर केला आहे. कोर्टाने आंदोलनस्थळ मोकळे करण्याचे आदेश दिल्यानंतरही बच्चू कडू आणि त्यांचे हजारो समर्थक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 'आमची व्यवस्था तुरुंगात करा', असे म्हणत त्यांनी पोलिसांना जेलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा, नागपूर-जबलपूर आणि नागपूर-हैदराबाद महामार्ग ठप्प झाले, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. आंदोलनामुळे सामान्य नागरिक, रुग्ण आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले, अनेक पेट्रोल पंपावरील इंधनही संपले. सरकारने चर्चेसाठी पाठवलेले प्रतिनिधी न पोहोचल्याने हा पेच अधिकच वाढला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement