Bacchu Kadu : 'आत्मXX करण्यापेक्षा आमदाराला कापा', बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य
Continues below advertisement
प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी बुलढाण्यात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी आमदारांना लक्ष्य केले. 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावं', असे खळबळजनक विधान बच्चू कडू यांनी केले आहे. कडू आपल्या वक्तव्यावर ठाम असून, 'त्यांना सोपायचं नाही तर पूजा करायची का? वेळ आल्यास मीच सोपणार' अशा शब्दात त्यांनी इशारा दिला. कमी दरात कापूस आणि सोयाबीन विकावे लागत असल्याने त्यांनी सरकारवर टीका केली. यावर, आमदार संजय शिरसाट यांनी कडू यांना बोलताना भान ठेवण्याचा सल्ला दिला, ज्यावर कडू यांनी आधी तुम्ही वागण्यात भान ठेवा असे प्रत्युत्तर दिले. कडू यांनी 'देवाभाऊ' (देवेंद्र फडणवीस) यांच्यावरही टीका करत, त्यांना आता दिल्लीची हवा लागली असून ते विदर्भातील शेतकऱ्यांना विसरले आहेत, असे म्हटले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement