Bachchu Kadu PC : अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन करणार, कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक
Bachchu Kadu PC : अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन करणार, कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक
कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलाय. बच्चू कडूंनी 'डिसीएम टू सीएम' अशा आंदोलनाची घोषणा केलीय. या आंदोलनांतर्गत बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर 'अर्थसंकल्प वाचन आंदोलन' करीत त्यांना कर्जमाफीची आठवण करून देणारायेत. अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणारायेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केलीय. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होतेय. 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचणार. #ज्यांच्यामूळे शेतकर्यांनी आत्महत्या केल्यात त्यांचे घर पाडणार का. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना अनुदान का देत नाहीत. डीसीएम ते सीएमच्या घरासमोर आंदोलन करू. अजित पवार, पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोडच्या घरासमोर आंदोलन करणार. 7 जुलैला कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गुरुकुंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार. अजित पवारांना राष्ट्रवादीचा बाप असलेल्या भाजपचे कर्जमाफीचे आश्वासन पुर्ण करावे लागेल.