Baccu Kadu Protest: दुपारी 4 वाजता राज्यमंत्री भोयर, जैस्वाल आंदोलनस्थळी भेट देणार
Continues below advertisement
नागपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत. 'भलेही तुम्ही कर्जमाफी नंतर करा पण त्याचा जीआर तरी आज काढा', अशी आग्रही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. गेल्या वीस तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागपूरच्या महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव, उसाची एफआरपी, दुधाचे दर आणि सातबारा कोरा करणे यासह शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ आणि दिव्यांगांच्या एकूण २२ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे दोन प्रतिनिधी आंदोलकांशी चर्चा करणार असून, या चर्चेतून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement