Farmers Protest: 'लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही', Bachchu Kadu यांचा एल्गार
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी नागपूरकडे भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. या मोर्चात महादेव जानकर, राजू शेट्टी आणि अजित नवले हे नेतेही सहभागी होणार आहेत. ‘लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, कारण यापूर्वी बैठकीत दिलेले शब्द पाळले गेले नाहीत’, अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. आज अमरावतीच्या कुरळपूर्णा येथील त्यांच्या घरातून हजारो कार्यकर्त्यांसह शेकडो ट्रॅक्टर नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत, उद्या वर्ध्यात मुक्काम करून ते नागपुरात दाखल होतील. या आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले असले तरी, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच बैठकीचा निर्णय घेतला जाईल, असे कडू यांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement