Bachchu Kadu : बावनकुळे चर्चेआधी अभिप्राय देत असतील तर चुकीचं, बच्चू कडू आक्रमक

Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी कर्जमुक्तीच्या (Loan Waiver) मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. 'भाजपावाले (BJP) आई निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करतात, तो डाग जर तुम्हाला खरंतर पुसून टाकायचा असेल, तर आता तुम्ही कर्जमुक्तीची घोषणा वेळ, तारखेसह कशी होते ते सांगावी', अशी थेट मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान (Nagpur Protest) सरकारसोबत चर्चेची तयारी दाखवताना त्यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली. या आंदोलनात राजू शेट्टी (Raju Shetti), महादेव जानकर (Mahadev Jankar), आणि वामनराव चटप (Wamanrao Chatap) यांसारखे नेतेही सहभागी झाले आहेत. चर्चेसाठी मुंबईला (Mumbai) येण्यावरून सुरुवातीला मतभेद होते, पण आता सह्याद्री अतिथिगृहात (Sahyadri Guest House) मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. कडू यांनी न्यायालयीन हस्तक्षेपावरही नाराजी व्यक्त केली आणि मीडियाच्या भूमिकेवर टीका करत, 'तुम्ही नारदासारखी भांडणं लावता', असे म्हटले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola