Bachchu Kadu on Election Commission : आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल', बच्चू कडू आक्रमक
Continues below advertisement
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. 'निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल', असे खळबळजनक विधान बच्चू कडू यांनी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Body Elections) त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Janashakti Paksha) सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये (EVM) कोणताही घोळ होता कामा नये, अशी भीती आणि मागणीही त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही आणि भाजप (BJP) कटकारस्थान करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement