Bachchu Kadu Akola : अकोल्यातील शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भेटीला बच्चू कडू
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBachchu Kadu Akola : अकोल्यातील शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या भेटीला बच्चू कडू
अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रविण जंजाळ हा जवान काश्मिरातील कुलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. काल रात्री उशिरा आमदार बच्चू कडू यांनी अकोल्यातल्या मोरगाव भाकरे येथे शहीद प्रविण जंजाळ यांच्या निवास स्थानी भेट दिली. आणि शहीद कुटूंबियांचं सांत्वन केलंय.
ही बातमी पण वाचा
Bachchu Kadu : ... तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही; बच्चू कडू यांची मोठी घोषणा
अमरावती : शेतकरी आणि दिव्यांगांसबंधी आपल्या काही मागण्या आहेत, त्या जर सरकारने पूर्ण केल्या तर मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतो असं वक्तव्य प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलं. आपण महायुतीत नसून वेळ पडली तर शेतकरी , मजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी करून आपण निवडणूक लढवू असंही ते म्हणाले. 19 तारखेला राज्य सरकारला आमच्या मागण्याचे निवेदन देणार असल्याचं ते म्हणाले.
आगामी निवडणूक महायुतीतून लढवणार का असा प्रश्न विचारल्यानंतर आमदार बच्चू कडू म्हणाले की, कोण म्हणतंय मी महायुतीमध्ये आहे? आपण महायुतीमध्ये नाही. वेळ पडली तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू..
शेतकरी आणि दिव्यांगांच्या संबंधित मागण्यासंदर्भात बच्चू कडू हे राज्य सरकारला 19 जुलै रोजी निवेदन देणार आहेत. त्यामधील मागण्या जर सरकारने मान्य केल्या तर आपण निवडणूक लढवणार नाही असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. मी जागा सोडल्यावर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यायची त्यांनी द्यावी असंही ते म्हणाले.