Dhurla Nivdnukicha : २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, Mahayuti-MVA मध्ये जागावाटपाचे चित्र अस्पष्ट
Continues below advertisement
राज्यात २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ईव्हीएमवर शंका घेत निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. 'निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल', असं विधान करत बच्चू कडू यांनी थेट निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दुसरीकडे, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत, तर करुणा मुंडे-शर्मा यांनी 'स्वराज्य शक्ती सेना' या नव्या पक्षाची घोषणा करत सर्व निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाची संयुक्त बैठक पार पडली असून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement