Shocking Statement: 'जीव देण्यापेक्षा आमदाराला कापा', माजी आमदार Bacchu Kadu यांचे वादग्रस्त वक्तव्य

Continues below advertisement
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे एका शेतकरी हक्क परिषदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा,' असं धक्कादायक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे संतप्त झालेल्या कडू यांनी, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याऐवजी त्यांनी एखाद्या आमदाराला मारले पाहिजे, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट म्हटले आहे, तर काहींनी शेतकऱ्यांना हिंसेसाठी प्रवृत्त करण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली आहे. भाषणाच्या वेळी आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे, कारण त्याचा परिणाम लहान मुलांपर्यंत पोहोचतो, असे मतही काही नेत्यांनी व्यक्त केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola