Bacchu Kadu Morcha Nagpur : बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम, महामार्गानंतर आता रेल्वे रोखणार?

Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात 'महाएल्गार' आंदोलन (Maha Elgar Protest) तीव्र झाले असून, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला आहे. 'त्यांना मोठे व्यापारी पाहिजे, अदानी अंबानीसोबतच राहायचं,' असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून, सरकारने दुपारी १२ वाजेपर्यंत मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोखण्याचा इशारा कडूंनी दिला आहे. शेतकरी कर्जमाफी (`सातबारा कोरा`) आणि इतर २२ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. चर्चेसाठी बोलावणे हा अटक करण्याचा डाव होता, असा आरोप करत कडूंनी सरकारची बैठक नाकारली. आम्ही डोक्याला कफन बांधून आलो आहोत आणि गोळ्या खायलाही तयार आहोत, असेही ते म्हणाले. या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola