Bachchu Kadu Protest : 'चर्चेसाठी मुंबईत या', बावनकुळेंची मध्यस्थी, सरकारची ऑफर बच्चू कडूंनी नाकारली
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. Bacchu Kadu यांनी सरकारचा मुंबईत येऊन चर्चा करण्याचा प्रस्ताव नाकारला आणि 'मंत्री आणि अधिकाऱ्यांनीच इथे येऊन चर्चा करावी, कर्जमाफी होईपर्यंत आम्ही हटणार नाही', असा थेट इशारा दिला आहे. यानंतर आता मध्यस्थी करण्यासाठी सरकारने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक बच्चू कडू यांनी नाकारल्याने रद्द झाली होती, त्यामुळे आता बावनकुळे आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता निर्माण झाली आहे. बच्चू कडू यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग रोखून धरला असून, जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement