Bacchu Kadu: राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता ABP Majha
महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री येणार अडचणीत. राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेय. राज्यमंत्री बच्चू कडूंवर ़़फौजदारी कारवाईसाठी राज्यपालांनी परवानगी दिलीये. वंचित बहूजन आघाडीनं बच्चू कडूंवर अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप केला होताय. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचितनं केला होताय. अकोला न्यायालयाने कारवाईसाठी राज्यपालांची मंजूरी घेण्याचे दिले होते आदेश याचिकाकर्त्यांना दिले होतेय. यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी 7 फेब्रूवारीला कारवाईच्या परवानगीच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होतीय. राज्यपालांनी कारवाईची परवानगी दिल्यानं राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ झालीय. राज्यपालांच्या पत्रात यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेय. वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडू यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केलीये