कबड्डीच्या मैदानात राज्यमंत्री Bacchu Kadu ,अमरावतीत कबड्डी खेळाडूंसोबत घेतला खेळण्याचा आनंद!

Amravati : राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एन्ट्री केली आणि यावेळी कबड्डी पटूंना चित केलं. अमरावतीच्या चांदूरबाजार येथील निर्मिती कबड्डी क्लब द्वारे 'प्रहार चषक' भव्य कबड्डी लिग सामने आयोजित केल्या गेलं आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याहस्ते आज उदघाटन झालं. या स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः मैदान उतरून कबड्डी खेळाचा आनंद घेतला. राज्यमंत्री बच्चू कडूना असलेला कबड्डी खेळाचा छंद ते आजही जपतात. आयोजित कबड्डी सामन्याच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खेळाडी भूमीका पार पाडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola