स्वातंत्र्यदिनी Bacchu Kadu यांच्या तर्फे शहिदांच्या मातापित्यांचा सन्मान सोहळा : ABP Majha

Continues below advertisement

स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत राज्याचे मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक वेगळा उपक्रम राबवलाय. स्वातंत्र्यदिनी त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करताना वीरमातांचे पाय धुतले. चांदीच्या ताटात या कुटुंबियाना त्यांनी भोजन दिलं आणि त्यांना प्रेमाने जेवणही वाढलं. ग्रीनलँड हॉटेलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी वीरांच्या माता-पित्यांना शाल आणि साडी-चोळी देऊन त्यांचा गौरवही केला. या आगळ्यावेगळ्या सन्मानाने कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या कार्यक्रमात 28 शहीदांच्या कुटूंबियांना बोलविण्यात आलं होतंय. बच्चू कडूंनी स्वखर्चाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram