Bacchu Kadu Morcha : आम्ही कर्जमुक्ती मागायला तुमच्या घरी येतोय, Bacchu Kadu यांचा सरकारला थेट इशारा
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी (Loan Waiver) मोठे आंदोलन पुकारले आहे. 'तुम्ही मतांसाठी आमच्या घरी येता, आता आम्ही कर्जमुक्ती मागायला तुमच्या घरी येतोय,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. अतिवृष्टी, सोयाबीन आणि कापसाचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, सरकारने तत्काळ कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अजित पवार यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, 'कर्जमाफीसाठी याच्या पेक्षा चुकीची की योग्य वेळ असू शकते?' असा सवाल केला. मुख्यमंत्र्यांच्या 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत नागपुरातून हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement