Babasaheb Purandare Birthday : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं 100व्या वर्षात पदार्पण
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण करतायत. या निमित्तानं पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलंय. शिवशाहिरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे भव्य व्यक्तिचित्र पुढचे तीन दिवस लोकांना पाहता येणार आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेकांना निमंत्रित करण्यात आलंय.