Babasahb Patil : बाबााहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रिपद सोडलं
Continues below advertisement
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड तुरुंग अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. 'बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिले आहेत,' असा थेट आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तुरुंग अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर केला आहे. दुसरीकडे, बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडल्याचे सांगितले असले तरी, तीन पक्षांच्या सरकारमध्ये तडजोड करावी लागत असल्याने लातूरचे पालकमंत्रीपद मिळाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. लातूरचे पालकमंत्रीपद साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना देण्यात आले आहे. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता गोंदियाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement