Babasaheb patil Gondia : गोंदिया पालकमंत्रीपदावरून बाबासाहेब पाटील यांचा राजीनामा?
Continues below advertisement
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटील यांनी सोडले असून, त्यांच्या जागी इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलामागे पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण दिले जात असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या विदर्भातील पालकमंत्र्यांवरील टीकेची किनार असल्याची चर्चा आहे. 'विदर्भामध्ये जे पालकमंत्री आहेत ते केवळ सोहळ्यासाठी आणि सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट या सणांसाठी येतात', अशी थेट टीका प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरातील एका मेळाव्यात केली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी वरळी येथील बैठकीत या बदलाची घोषणा केली. इंद्रनील नाईक हे विदर्भातील असल्याने त्यांना गोंदियाला जाणे सोयीस्कर ठरेल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागितले होते, मात्र त्यांना दूरचा जिल्हा मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जाते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement