Babanrao Taywade On Laxman Hake : ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरज नव्हती : बबनराव तायवाडे

Continues below advertisement

Babanrao Taywade On OBC : ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरज नव्हती : बबनराव तायवाडे
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाकेंचं गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे.. या आंदोलनाची गरज नसल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडेंनी सांगितलंय. त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच दुमत असल्याचं समोर आलंय. ओबीसींच्या आरक्षणावर संवैधानिक गदा आली आहे अशी कोणतीही परिस्थिती सध्या नसल्याचं तायवाडेंनी सांगितलंय. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही या सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याचं लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलंय
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडेंनी नेमकी काय भूमिका मांडलीय पाहुयात... 
लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात सुरू करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठीच्या आंदोलनाची गरजच नव्हती, अशी टीका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी केली आहे. ओबीसींच्या आरक्षणावर (OBC Reservation) संवैधानिक गदा आली आहे अशी कोणतीही परिस्थिती सध्या नाही. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय करताना राज्य सरकारने लिहून दिले होते, की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही देणार नाही, त्या आश्वासनावर सरकार आजही ठाम आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे कोणत्या उद्दिष्टाने व कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे, हेच स्पष्ट नाही, अशी टिप्पणी बबनराव  तायवाडे यांनी केली. त्यांनी रविवारी नागपूरमध्ये एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाविषयी नापसंती व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये लक्ष्मण हाके यांच्या प्राणांतिक उपोषणाविषयी एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram