Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्धीकी प्रकरणी आणखी एकाला अटक

Continues below advertisement

Baba Siddique Shot Dead  : बाबा सिद्धीकी प्रकरणी आणखी एकाला अटक 

पुण्यातील बोपदेव घाटात काही दिवसांपुर्वी फिरण्यासाठी गेलेल्या तरूण, तरूणीला मारहाण करून त्यांच्याजवळ असलेल्या मौल्यवान वस्तू लुटून तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींनी आपला गुन्हा लपवण्यासाठी काय काय केलं ते समोर येत आहे. तर हा गुन्हा करण्यापुर्वी आरोपींनी दारू आणि गांजाचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांनी या गुन्ह्यानंतर आपले मोबाईल फोन देखील बंद करून ठेवले होते. आरोपींनी त्यांचे मोबाइल फोन फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सामूहिक अत्याचार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. (Bopdev Ghat Incident)  मोठ्या तपासानंतर दोन आरोपी ताब्यात अख्तर शेख (वय 27, रा. नागपूर), चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय 20, रा. डिंडोरी, रा. मध्यप्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणीला आणि मित्राला कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू लुटून तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना 3 ऑगस्ट रोजी घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. आरोपींचा शोधण्यासाठी पोलिसांची 60 पथकं तयार करण्यात आली. अख्तर शेखला सोमवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आले. कनोजियाला बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या येवलेवाडीतून ताब्यात घेण्यात आले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram