Baba Siddique Murder case : बाबा सिद्दिकींच्या हत्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचकडून चार्जशीट दाखल, चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती समोर

Continues below advertisement

Baba Siddique Murder case : बाबा सिद्दिकींच्या हत्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचकडून चार्जशीट दाखल, चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती समोर

बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक माहिती समोर, गोळीबार करण्यापूर्वी तिन्ही शूटर कार्यालयात ३ ते ४ वेळा घुसले होते, रेकी करताना आरोपी पिस्तूल घेऊन जायाचे.

ही बातमी पण वाचा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Case) यांच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक बाब उघड झाली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून अटक केलेल्या दोन आरोपींच्या रडारवर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा होता, अशी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique Case) यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पुण्यातून अटक करण्यात आलेल्या रूपेश मोहोळ आणि गौरव अपुणे या दोन आरोपींनी फरार आरोपी शुभम लोणकरसह माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येची पूर्ण तयारी केली होती. मात्र त्याआधीच गुन्हे शाखेने त्याला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केली.(Baba Siddique Case) 

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश मोहोळ आणि गौरव अपुणे या दोन आरोपींना माजी अधिकाऱ्याच्या मुलाचा खून करायचा होता. कारण सप्टेंबर 2024 मध्ये पुण्यातील उत्तम नगर भागात त्यांचा जवळचा मित्र जयदीप ज्ञानेश्वर भोंडकर याच्या हत्येच्या कटात त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. अटक आरोपी अमित सुदाम गुर्जर याला त्याने याच कटात मदत केली होती. या खुलाशानंतर मुंबई क्राईम ब्रँचने हे इनपुट पुण्याच्या उत्तम नगर पोलिसांशी शेअर केले आहे, जेणेकरून अधिकाऱ्याच्या मुलाला सुरक्षा पुरवली जावी. गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram