Baba Adhav Pune Protest : विधानसभा निवडणुकीत पैशांचा मोठ्याप्रमाणात वापर, आढाव यांचा आरोप; पुण्यात आंदोलन

Continues below advertisement

Baba Adhav Pune Protest : विधानसभा निवडणुकीत पैशांचा मोठ्याप्रमाणात वापर, आढाव यांचा आरोप; पुण्यात आंदोलन

ईव्हीएममध्ये घोटाळा, बाबा आढावांचा आरोप 

ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच वस्त्रहरण करण्यात आलं आहे.  लोकसभा निवडणुकीलाठी निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो? असा सवाल देखील आढाव यांनी उपस्थित केला आहे. EVM आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली आहे. दरम्यान, मी तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव म्हणाले. 

गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे,  सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार 

यावेळी बोलताना बाबा आढाव म्हणाले की, गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे. आदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिलं जात नाही. याबाबत मी सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव म्हणाले. दरम्यान, आढाव यांचे वय 95 वर्ष आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, वय वाढलं म्हणून काय झालं? असं ते म्हणाले.

निवडणुकीच्या काळात सरकारी पैशांचा मोठा गैरवापर 

लोकशाहीतील एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे, की सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच सांगितलं पाहिजे असे बाबा आढाव म्हणाले. आज देशात लोकशाहीचं वस्त्रहरण सुरु झालं आहे. रोज लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहे. शेतकऱ्यांचे, तरुणांचे मोठे प्रश्न आहेत. या सर्व गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी आत्मक्लेष उपोषण करणार असल्याचे आढाव म्हणाले. निवडणुकीच्या काळात सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झाल्याचे देखील आढाव म्हणाले. याच्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं असल्याचे आढाव म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram