Baba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषण

Continues below advertisement

Baba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषण

राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे, असे मत व्यक्त करीत तीन दिवस ते उपोषणाला बसले होते.  
निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी म्हटलं होतं.  या घटनेचा निषेध म्हणून 94 वर्षीय डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन पुकारलं. आज शनिवारी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. बाबा आढाव यांनी गुरूवारी तीन दिवसांसाठीचं आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram