Baan Ganga Aarti Row: पोलिसांच्या नकारानंतर अखेर तिढा सुटला! Mangal Prabhat Lodha म्हणाले, 'सर्व तिढे सुटलेले आहेत'

Continues below advertisement
मुंबईतील वाळकेश्वर येथील प्रसिद्ध बाणगंगा तलावावर होणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेच्या महाआरतीचा तिढा अखेर सुटला आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर पोलीस प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. 'आता सर्व तिढे सुटलेले आहेत, आरती ठरल्याप्रमाणे होणार आहे', असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. गौड सारस्वत ब्राह्मण (GSB) ट्रस्टतर्फे आयोजित ही महाआरती पूर्वी ५ नोव्हेंबर रोजी होणार होती, परंतु वाहतूक आणि गर्दीच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतर मंत्री लोढा यांनी पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढला. आता ही महाआरती ७ नोव्हेंबर रोजी होणार असून, भाविकांना नोंदणी करण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola