Digital Azaan: भोंग्यांशिवाय 'अजान' आता थेट मोबाईलवर, सोलापुरात नवा पॅटर्न
Continues below advertisement
सोलापूरमध्ये (Solapur) गव्हानी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्यानंतर, मुस्लिम समाजाने तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. फॉरेस्ट परिसरातील बडी मशीद ट्रस्टने (Badi Masjid Trust) मोबाईल ऍपद्वारे (Mobile App) अजान थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 'भोग्यांशिवाय श्रद्धेचा सुअर कसा जपता येतो याचं हे जिवंत उदाहरण ठरलंय'. प्रशासनाच्या नियमांचे पालन करताना धार्मिक भावनांचा आदर कसा ठेवता येतो, हे यातून सिद्ध झाले आहे. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या बैठकीनंतर सर्वधर्मीयांनी आपले भोंगे उतरवले होते, ज्यामुळे शहरात शांतता पसरली. मात्र, अजान कशी ऐकायची या प्रश्नावर बडी मशीद ट्रस्टने मोबाईल ऍपच्या साहाय्याने एक प्रभावी तोडगा काढला आहे, जो आता संपूर्ण शहरासाठी एक आदर्श ठरत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement