Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

Continues below advertisement

Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

ही बातमी पण वाचा

निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

अहमदनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेसने स्टार प्रचारांची टीम महाराष्ट्रात उतरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज भाजप नेते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेक नेते प्रचारदौरे करत महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर भाजपने यंदाच्या निवडणुकीत मायक्रो प्लॅनिंग केलं असून तब्बल 90 हजार भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्रात आल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी येथील सभेतून बोलताना सांगितले. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे, केंद्रातील भाजप नेत्यांनीही या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी, जाहिरातबाजी आणि मोठी प्रचारयंत्रणा व बुथ यंत्रणा राबवली आहे. पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) वक्तव्यावरुन ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी इतर राज्यातील भाजपचे जवळपास 90 हजार लोक आले असून त्यांच्या येण्यानं महाराष्ट्रातील ऑक्सिजन कमी झाल्याचे मिश्कील टिप्पणी पंकजा मुंडे यांनी पाथर्डी येथील जाहीर सभेत बोलताना केली. पंकजा यांनी हसत-खेळत हे सांगितलं असलं तरीही भाजपचे अतिशय बारकाईने कामकाज सुरू असल्याचं देखील यावरून स्पष्ट होतं आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक बुथवर लक्ष ठेवण्यासाठी इतर राज्यातून भाजपचे पदाधिकारी आणि नेते आले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, या निवडणुकीसाठी भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावल्याचे पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram