ABP News

Aurangabad : दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी 30 हजार रुपये मागणाऱ्या संस्थाचालकाला अटक

Continues below advertisement

आज दहावीची परीक्षा सुरु होतेय आणि याबाबत औरंगाबादमधून एक खळबळजनक बातमी आहे.... दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी 30 हजार रुपये मागणाऱ्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केलीय......कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एस. पी. जवळकर यांनी एका बहिःस्थ विद्यार्थ्याकडे 30 हजार रुपयांची मागणी केली.हॉलतिकीट देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी  बहिःस्थ परीक्षार्थ्याकडे त्यांनी ३० हजार रुपये मागितल्यानंतर 10 हजार रुपये स्वीकारताना त्यांना पोलिसांनी अटक केली. शाळेतील लिपिक सविता खामगावकर यादेखिल लाचखोरीत सहभागी असल्यानं त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram