Aurangabad : मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केले - Raosaheb Danve : ABP Majha

Continues below advertisement

Raosaheb Danve : मी राजकारणातील कुंभार आहे. हातातलं मडकं फुटलं की कुंभार  रडत नाही. फेकून देतो आणि पुन्हा नवं तयार करतो. मी अनेक नेते तयार केले आहेत, असे वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. युवा मोर्चा भाकरी घरच्या डब्बा पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तुम्हला निवडणूकीसाठी तयार करायला आलोय, असेही दानवे म्हणाले. 

आजची परिस्थिती कशी आहे. भाजपा विरोधात सगळे उभे आहेत. हे वर्ष निवडणूकीचं आहे. नगरपंचायतमध्ये आम्ही दाखवून दिलं आहे, असे दानवे यांनी सांगितले. कार्यकर्ता कसा असला पाहिजे, मूळ नाही गाजर नाही हे उपटलं की एकटं निघते. कार्यकर्ता भुईमूगाच्या वेलासारखा पाहिजे, उपटला की गुच्छ, असे दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. रविवारी रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टी केली. बहुतेक कार्यकर्त्यांनी घरून डब्बा आणला होता .

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या डब्बा पार्टी कार्यक्रमात कोरोना नियमांचा फज्जा उडाला होता. उपस्थित असणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन केलं नाही. इतकेच नाही तर कार्यक्रमात कुणाच्याही तोंडाला मास्क नव्हता. हे सर्व पाहिल्यानंतर कोरोना नियम राजकारण्यांना नाहीत का? असा प्रश्न उपस्थित राह

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram