MNS Adhiveshan | शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही, हिंदुत्वावर काम करणारी संघटना : अंबादास दानवे | ABP Majha

येत्या 23 जानेवारीला म्हणजे उद्याच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुंबईत महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या राजकारणाची कूस बदलू शकतात. कारण राज ठाकरेंचा पुढील अजेंडा भगवा आहे. राज ठाकरेंच्या पक्षाच्या नवीन ध्वजाचे फोटो एबीपी माझाला मिळाले आहेत. मनसेने निवडणूक आयोगाला दोन नवे प्रस्तावित ध्वज पाठवले आहेत. एका ध्वजावर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं इंजिन आहे तर दुसऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. विशेष म्हणजे दोन्ही झेंड्यात फक्त आणि फक्त भगव्या रंगाला स्थान आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola