Auranagabad Bhondubaba exposed : चमत्कार दाखवा अन् 21 लाख मिळवा; अंनिसचं भोंदूबाबांना आव्हान
औरंगाबादमधल्या भोंदूबाबाचा माझानं पर्दाफाश केला आणि बाबावर कारवाईची मागणी झाली. काही वेळातच सरकारनंही त्याची दखल घेतली. या भोंदूबाबाच्या चौकशीचे आदेश मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्यानंतर पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. माझाच्या बातमीनंतर या मतदारसंघाचे आमदार आणि रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी त्याची तात्काळ दखल घेतली.