Pandharpur Vitthal Mandir : पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात आकर्षक पारंपारिक आकाशदिवे
Continues below advertisement
देशभर दिवाळीची धूम जोरात सुरु असताना अवघ्या विश्वाचे आराध्य असणाऱ्या विठूरायाची राउळी देखील आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाली आहे . दिवाळीनिमित्त मंदिरातील नामदेव महाद्वारावर पारंपरिक पद्धतीच्या भल्या मोठ्या चांदणीचा आकाशदिवा लावण्यात आला आहे तर विठ्ठल सभागृहात देखील दीपावलीचा भाला मोठा आकाशदिवा लावण्यात आला आहे . दिपवाळीनिमित्त रोज विठुराया , रुक्मिणी माता , महालक्ष्मी माता आणि व्यंकटेशाला ठेवणीतल्या पारंपरिक हिरेजडित दागिन्यात मढविण्यात येत आहे . दिवाळीच्या सणाला देवाचे दर्शन घडावे यासाठी देशभरातून रोज हजारो विठ्ठलभक्त मंदिरात येत आहेत .
Continues below advertisement
Tags :
Diwali Vithuraya Rukmini Mata Aradhya Vithuraya's Rauli Vidyut Roshanai Namdev Mahadwar Akashdiva Mahalakshmi Mata