Maharashtra Corona Death : महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा लपवण्याचा प्रयत्न?
महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा लपवण्याचा प्रयत्न सुरु आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. कारण राज्यात कोरोनामुळे झालेल्या 11 हजारांपेक्षा जास्त मृत्यूची नोंद नाही, अशी चर्चा सुरु आहे. राज्याच्या पोर्टलवर 11 हजार 617 मृत्यूंची नोंद दोन दिवसात करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.