Attempt to attack on Ravikant Tupkar | शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या चिखली रोड स्थित कार्यालयावर सशस्त्र हल्ला झाल्याची खळबळजनक घटना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात बसले असताना त्यांच्याच (सावळा) गावातील जनार्धन गाडेकर नामक इसमाने हातात कुर्‍हाड घेऊन तुपकर यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती आहे. यावेळी तुपकर यांच्यावर वार करण्यापूर्वी त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक मधात आल्याने अनर्थ टळला.पण, झटापटीत तुपकर यांच्या स्वीय सहाय्यकाला छातीत मार बसल्याची माहिती आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram